अमळनेर: आज 4 ऑगस्ट रोजी शाळेत .स्व श्री .मधुसूदन सुरजमल मुंदडा अर्थात शामदादा यांच्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
" दिव्यत्वाची ज्योत प्रचिती
तेथे कर माझे जुळती ''
गोरगरीबांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा असा संदेश ज्यांनी आपल्या कुटुंबाला दिला.'ज्यांच्या जीवन कार्यातून प्रत्येकाने बोध घेतला पाहिजे . ते अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजेच समाजसेवक शामदादा होय..नेतृत्व ,कर्तुत्व आणि दातृत्व यांचा त्रिवेणीसंगम लाभलेले समाजसेवक शामदादांचे आज 15 वे पुण्यस्मरण ..
" डोळ्यात आले पाणी ,
राहिल्या पावन आठवणी ''
कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री. ओमप्रकाश भाऊ मुंदडा यांनी देखील आपल्या अध्यक्षीय भाषणातून अनेक पावन पवित्र आठवणींना उजाळा दिला . शामदादाच्या जीवनाविषयी माहिती देतांना सांगितले की,
" कर्तव्यापरी असावी निष्ठा,
फळाची आस न लागे मना ''
कुठल्याही फळाची अपेक्षा न करता गोरगरीब, होतकरु अनेक तरुणांना खा.शि.या संस्थेत नोकरी दिल्या. शामदादांच्या 15 व्या पुऱ्यस्मरणार्थ विनम्र अभिवादन करतांना मुंदडा फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय .श्री .ओमप्रकाशजी मुंदडा, मुंदडा फाउंडेशनचे संचालक आदरणीय श्री .नरेंद्रभाऊ मुंदडा, मुंदडा फाउंडेशनचे चिटणीस आदरणीय श्री .योगेशभाऊ मुंदडा ,मुंदडा फाउंडेशनचे संचालक आदरणीय श्री. पंकजभाऊ मुंदडा व मुख्याध्यापक श्री . संदीप पवार सर, मुख्याध्यापक श्री . नरेंद्र साळुंखे सर, मुख्याध्यापक श्री. प्रभाकर विंचुरकर सर, मुखाध्यापक श्री.धनराज महाजन सर मुख्याध्यापक श्री अविनाश पाटील सर व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .
कार्यक्रमांचे सुत्रसंचालन सुनिल पाटील सर यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले .
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या