अमळनेर: शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात ९ ऑगस्ट क्रांती दिन, रक्षाबंधन व स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक ७ ऑगस्ट रोजी शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्काराच्या वेगवेगळ्या आसनांच्या प्रतिकृतीत ९०० विद्यार्थ्यांनी राखी साकाराली यात २०० फुट तिरंग्याचा वापर करण्यात आला. मैदानावर विद्यार्थ्यांना योगाच्या मुद्रेत बसविण्यात आलेआले. त्यानंतर बाहेरच्या बाजूने त्या राखिस तिरंग्याची झालर लावण्यात आली होती. हे दृश्य आकर्षक दिसत होते.
तसेच शाळेत हर घर तिरंगा मोहिमेंतर्गत इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्यांसाठी राखी बनविणे ही स्पर्धा घेण्यात आली. यातील काही राख्या या सीमेवरील सैनिकांसाठी पाठविण्यात आल्या व काही राख्या जळगाव जिल्हा पोलीस दलासाठी बनविण्यात आल्या आहेत. ५०० विद्यार्थ्यांनी आकर्षक व सुबक आशा राख्या तयार केल्या. या विद्यार्थ्यांना प्रेम सारस्वत, सौ नीलिमा सपकाळे, सौ स्वाती एडके, सौ वृषाली पाटील व श्रीमती योगिता महाजन या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
राखी बनविण्याची संकल्पना ही शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे यांची होती. तर शाळेचे उपमुख्याध्यापक श्री प्रशांत जगताप यांच्या मार्गदर्शनाने राखी तयार करण्यात आली यावेळी शाळेचे ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री संजय वानखेडे व शाळेच्या पर्यवेक्षिका सौ रमा तारे उपस्थित होत्या. या वेळी श्री हिम्मत काळे, श्री उमेश ढाकणे, जावेद पटेल, आनंद पाटील, प्रणीत येवले यांनी परिश्रम घेतले व सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या