Type Here to Get Search Results !

Banner

धरणगाव ते श्रीक्षेत्र मेहुण मुक्ताई पायी दिंडी सोहळ्यास प्रारंभ


धरणगाव: गेल्या २५ वर्षा पासुन सुरु असलेला येथील श्री माऊली वारकरी शिक्षण संस्थेचा वतीने आज धरणगाव ते मुक्ताईनगर नगर पायी दिंडी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प.महंत भगवानदास महाराज यांचा नेतृत्व व मार्गदर्शनातुन आज दि.२९/०२/२०२४ गुरुवार रोजी प्रारंभ झालेला हा पायी दिंडी सोहळा दि ०६/०३/२०२४ बुधवार रोजी मुक्ताई मंदिरात समारोप होणार असून आज पासून पुर्ण सप्ताहात दिंडीतील वारकरी ना चहानास्ता दुपारी व रात्रीचे मुक्कामाचे जेवण देणारे अन्नदाते देखील मोठ्या श्रध्देने व विश्वासाने दिंडी चे स्वागतासाठी सज्ज झाले आहेत व मोठ्या श्रद्धेने सहभागी होताना दिसत आहेत त्या अनुषंगानेच आज येथील सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ खुशाल महाजन याचा परीवाराकडुन दुपारी दिंडीतील पांचशे पायीवारी करणारे दिंडीतील भक्ताना पुरणाची पोळीचे जेवण देण्यात आले त्या प्रसंगी दिंडीचे मालक ह.भ.प.महंत भगवानदास महाराज यानी दिंडीतील दानशूर अन्नदात्याचे कौतुक करुन संस्थेचा वतीने आभार मानले तसेच पायी वारी दिंडीत दररोज मुक्कामाचा ठिकाणी किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या