अमळनेर: भगवान परशुराम जयंतीनिमित्त ब्राह्मण समाजातर्फे परमपूज्य प्रसाद महाराज यांच्या हस्ते परशुराम प्रतिमेचे पूजन करून रॅली काढण्यात आली परशुराम चौकात तिची सांगता झाली. त्या ठिकाणी जमलेल्या ब्राह्मण समाजातील सर्व संस्थांच्या वतीने काश्मीर पहलगाम शहरात अतिरेक्यांनी हिंदूंवर हल्ला केला त्यात मृत झालेल्या हिंदू बांधवांना समाजातर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली याप्रसंगी भगवान परशुरामांना शांती मंत्र म्हणून "हे परशुरामा आम्हा हिंदूंचे रक्षण कर" अशी प्रार्थना करण्यात आली श्री.झारे यांनी प्रस्ताव मांडला प्रा.डाॅ. पी जे जोशी सर यांनी निवेदन केले .
याप्रसंगी श्री. हरिभाऊ जोशी, प्रसाद जोशी, डॉ. शशांक जोशी तुषार झेंडे, नंदू कुलकर्णी, सुनील मांडे उपासनी, ब्रम्हे पुरोहित संघातील सदस्य व ज्ञानेश्वर पाठशाळेतील सदस्य व इतर समाज बांधवांची उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या