Type Here to Get Search Results !

Banner

अमळनेरला भारत निवडणूक आयोगामार्फत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे आयोजन


भारत निवडणूक आयोगामार्फत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम नव मतदारांची नाव नोंदणी व नावात दुरुस्ती असेल तर शिबिराचा लाभ घ्यावा- उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर

अमळनेर: भारत निवडणूक आयोगामार्फत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम अहर्ता दिनांक 01.07.2024 अंतर्गत

नव मतदारांची नाव नोंदणी

मयत मतदारांची वगळणी

तसेच नावात दुरुस्ती करणे

इत्यादी बाबींसाठी नागरिकांनी आपल्या मतदान केंद्रावरील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तथा बीएलओ यांच्याशी संपर्क साधायचा आहे. यासांठी दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी मतदान नोंदणी अधिकारी बूथ वर उपस्थित राहतील.

तरी शहरातील नागरिक यांनी सदर शिबिरात वरील प्रमाणे नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे, नावात दुरुस्ती या बाबी असल्यास शिबिरात जाऊन शिबिराचा लाभ घ्यावा व राजकीय पदाधिकारी यांनी नागरिकांना उद्युक्त करून शिबिरात घेऊन जावे. असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी श्री महादेव खेडकर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या