Type Here to Get Search Results !

Banner

महाराष्ट्रातील निवडणुका (maharashtra elections) लांबणीवर?


जम्मू आणि काश्मीर तसेच हरियाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्याने महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही दिवाळीनंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची चिन्हे आहेत. हरियाणा विधानसभेची मुदत ही ३ नोव्हेंबर तर महाराष्ट्र विधानसभेची मुदत ही २६ नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या विधानसभांची निवडणूक (Election) ही २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये एकत्र झाली होती. यंदा महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुका वेगवेगळ्या होणार आहेत. हरियाणा विधानसभेसाठी १ ऑक्टोबरला मतदान होईल.

"गेल्या वेळी महाराष्ट्र आणि हरयाणाची निवडणूक एकत्र झाली होती. पण, त्यावेळी जम्मू काश्मीरच्या निवडणुकांचा मुद्दा नव्हता. मात्र यावेळी चार राज्यांच्या निवडणुका (जम्मू-काश्मीर, हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंड) आहेत. त्यानंतर लगेचच दिल्ली विधानसभेचीही निवडणूक आहे. यावेळी जम्मू-काश्मीरच्याही निवडणुका होत असल्याने एकंदर यंत्रणेचा विचार करता आम्ही यंदा दोन-दोन राज्यांच्या निवडणुका एकत्र घेण्याचा निर्णय घेतलाय. शिवाय, जम्मू-काश्मीरची निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच मध्येच दुसऱ्या राज्यासाठी निवडणूक जाहीर करणं योग्य नाही. याशिवाय इतर अनेकही कारणे आहेत. महाराष्ट्रात पाऊस होता, त्यामुळे बीएलओची कामे झालेली नाहीत. तसेच, आगामी काळात गणोशोत्सव, पितृपक्ष, नवरात्री, दिवाळी असे सण देखील आहेत, त्या अनुषंगाने नियोजन करत आहोत. विधानसभेची मुदत संपण्याच्या सहा महिन्यांच्या आतच या निवडणुका होतील", असे केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या