Type Here to Get Search Results !

Banner

श्री मंगळग्रह मंदिरातील सेवेकरांना दिवाळी फराळ वाटप


अमळनेर : धार्मिकतेसोबतच सामाजिक कार्यातही अग्रेसर असलेल्या मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे श्री मंगळग्रह मंदिरातील सेवेकऱ्यांना दरवर्षाप्रमाणे यंदाही वसू बारसच्या दिवशी दिवाळी फराळ वाटप करुन त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची दिवाळी गोड केली.
मंगळग्रह सेवा संस्था नेहमीच सामाजिक भान राखत नाविण्यपूर्ण उपक्रम राबवित असते. समाजाबरोबरच श्री मंगळग्रह मंदिरातील सेवेकऱ्यांचीही काळजी संस्था घेत असते. त्याचाच एक भाग म्हणून येथील १०० हून अधिक सेवकऱ्यांना दिवाळीच्या पहिल्या दिवशी अर्थात वसू बारसच्या दिवशी संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाने दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
    यावेळी उपस्थित उपाध्यक्ष एस. एन. पाटील, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे, मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, व्ही. व्ही. कुलकर्णी, हेमंत गुजराथी, उज्वला शहा, ए. टी. पाटील, ए. डी. भदाणे, राहुल बहिरम आदींच्या हस्ते सर्व सेवेकऱ्यांना दिवाळी फराळाचे किट वाटप करण्यात आले. दिवाळी गोड झाल्याने सेवेकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या