Type Here to Get Search Results !

Banner

महाराष्ट्र राज्य सैनिकी शाळा असोसिएशनच्या सदस्यपदी उमेश काटे


अमळनेर - महाराष्ट्र राज्य सैनिकी शाळा असोसिएशन ची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणी सदस्यपदी विजयनाना पाटील आर्मी स्कूल चे शिक्षक उमेश प्रतापराव काटे यांची निवड करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२४ ते सन २०२७ या कालावधी साठी राज्य अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत, राज्य सचिव विश्वनाथ माळी यांनी उर्वरित कार्यकारणी घोषित केली. यापूर्वी श्री. काटे यांनी राज्य सैनिकी शाळा कृती समितीच्या माध्यमातून अनेक शिक्षकांच्या समस्या शासन दरबारी मांडून न्याय मिळवून दिला आहे. त्यांच्या निवडीबद्दल माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, संस्थेच्या मार्गदर्शिका शीलाताई पाटील, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डी बी पाटील, प्रा श्याम पवार, प्रा के वाय देवरे, संस्थेचे मानद शिक्षण संचालक प्रा सुनील गरुड, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी कविता सुर्वे यांनी अभिनंदन केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या