Type Here to Get Search Results !

Banner

लोकशाहीच्या उत्सवात मतदानाचा पवित्र हक्क बजवा -मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांचे प्रतिपादन


जिल्हा स्तरीय स्वीप जनजागृती कार्यक्रम संपन्न 

जळगाव: जिल्हा परिषद जळगाव, पंचायत समिती जळगाव तर्फे आज दि 30 ऑक्टोबर 2024 रोजी शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक विद्यालयात स्वीप मतदार जनजागृती उपक्रमा अंतर्गत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत साहेब यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित साहेब, शिक्षणाधिकारी विकास पाटील, गट विकास अधिकारी श्वेता पालवे यांनी मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले.यामध्ये अहिराणी पथनाट्याद्वारे मतदान जनजागृती ,जनजागृती गीत, रांगोळी स्पर्धा ,सेल्फी पॉईंट व सिग्नेचर मोहीम, मतदान जागृती रॅली या उपक्रमांचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. श्री अंकित साहेब यांनी मतदान जनजागृती रॅलीला हिरवे झेंडे दाखवून रॅलीची सुरुवात केली.
  या कार्यक्रम प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी एस अकलाडे,गट विकास अधिकारी श्रीमती श्वेता पालवे , प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री विकास पाटील,गटशिक्षणाधिकारी श्रीमती सरला पाटील , गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती धरणगाव श्रीमती भावना भोसले ,उपशिक्षणाधिकारी श्री फिरोज पठाण ,शालेय पोषण आहार अधीक्षक विजय पवार, महिला विकास अधिकारी संपदा संत, आरोग्य अधिकारी डॉ पांढरे सरपंच हिलाल भिल,उषा बाई पाटील व विविध विभागाचे अधिकारी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
योगेश भालेराव सर यांनी जनजागृती गीत सादर केले. धरणगाव पंचायत समिती च्या कला पथकाने पथनाट्य सादर केले. विविध रांगोळ्या काढुन मतदान करण्याचा संदेश देण्यात आला. मतदान करण्याची प्रतिज्ञा याप्रसंगी घेण्यात आली.प्रास्ताविक उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी एस अकलाडे यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आर के पाटील व विजय पवार यांनी केले 
 या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य ग्रामपंचायत शिरसोली प्र बो प्र न बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ,जि प प्राथमिक शिरसोली प्र न व प्र बो शाळेचे सर्व शिक्षक व कर्मचारी, हिराबाई पाटील विद्यालय, पंचायत समिती जळगाव चे सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. मुख्याध्यापक आर एस आंबटकर, गोपाळ बारी,कल्पना पाटील, मेघा परदेशी,विस्तार अधिकारी सुनील दांडगे, श्री इंगळे, श्री बढे, दोन्ही गावांचे ग्रामपंचायत अधिकारी जयपाल चिंचोरे व कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीते साठी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या