अमळनेर: विधानसभा मतदार संघात महायुतीचे मंत्री अनिल भाईदास पाटील हे पुन्हा विजयी झाले आहेत. कार्यकर्त्यांनी जल्लोष करत त्यांचे जोरदार स्वागत केले आहे. महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल भाईदास पाटील हे अमळनेर विधानसभा मतदार संघांतून पुन्हा विजयी झाले आहेत. त्यांना माजी आमदार शिरीष चौधरी तसेच महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे डॉ. अनिल शिंदे यांचे आव्हान उभे केले होते. या लढाईत अनिल भाईदास पाटील हे ३३ हजार ४३५ मतांनी दणदणीत विजय मिळविला आहे.
अनिल भाईदास पाटील यांना 1 लाख 9 हजार 445 मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांना 76 हजार 10 तर डॉ. अनिल शिंदे यांना 13 हजार 798 मते मिळाली आहेत.
मंत्री अनिल पाटलांची श्री मंगळ ग्रह देवतेवर अपार श्रद्धा
मंत्री अनिल पाटील यांची श्री मंगळ ग्रह देवतेवर अपार श्रद्धा दिसून आली. २०१९ च्या अमळनेर विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी अनिल पाटील सकाळपासून येथील ख्यातनाम श्री मंगळ ग्रह मंदिरात देवाच्या सान्निध्यात होते.
यंदाच्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशीही अनिल पाटील हे सकाळपासून श्री मंगळ ग्रह मंदिरात ध्यानस्थ होते. विजयी घोषित होताच अनिल पाटील यांनी प्रथमतः श्री मंगळग्रह देवतेचा आशीर्वाद आणि त्यानंतर मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. मंदिरात सुरू असलेल्या श्री कालभैरव यागादरम्यान अनिल पाटील यांनी भेट देत प्रार्थनाही केली. त्यानंतर अनिल पाटील मतमोजणी केंद्राजवळ मार्गस्थ झाले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या