Type Here to Get Search Results !

Banner

'युजीसी-नेट' परीक्षेची अर्जप्रक्रिया सुरू! (UGC-NET EXAM)



अंतिम मुदत १० डिसेंबर

जळगांव: राष्ट्रीय परीक्षा एजन्सी म्हणजेच एनटीएने यूजीसी-नेट परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. १ ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान होणाऱ्या या परीक्षेची ऑनलाइन अर्जनोंदणी सरू झाली आहे. परीक्षेला बसू इच्छिणारे विद्यार्थी १९ नोव्हेंबरपासून अर्ज नोंदणी करू शकतात. यासाठीची अंतिम मुदत १० डिसेंवर आहे. विद्यापीठे आणि महाविद्यालये येथे 'सहायक प्राध्यापक' 'ज्युनिअर रिसर्च फेलोशिप व सहाय्यक प्राध्यापक' या पदांसाठी पात्र उमेदवार निवडण्यासाठी यूजीसी-नेट ही परीक्षा घेतली जाते. एकूण ८५ विषयांसाठीचे उमेदवार ही परीक्षा देऊ शकतात. ही परीक्षा कम्प्युटर बेस्ड टेस्ट असून ती विविध शहरांमध्ये वेगवेगळ्या केंद्रांवर घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी परीक्षा शुल्क ऑनलाइन भरण्याची अंतिम मुदत ११ डिसेंबर आहे. ऑनलाइन अर्जातील तपशील सुधारण्यासाठी किंवा बदलण्यासाठी १२ आणि १३ डिसेंबरची मुदत आहे. इच्छुक उमेदवारांनी
https://ugcnet.nta.ac.in/ संकेतस्थळाला भेट द्या. अर्जांसोबत दिला जाणारा मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी उमेदवार किंवा त्यांचे पालक यांचाच असावा. याची खबरदारी उमेदवारांनी घ्यावी.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या