अमळनेर: लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मनोहर महाजन होते. यावेळी भारतीय संविधानाचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. सर्व शिक्षकांनी प्रतिमापूजन केले, त्यानंतर मुख्याध्यापक मनोहर महाजन यांनी संविधानाचे महत्त्व सांगितले. यावेळी लोकमान्य विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या