Type Here to Get Search Results !

Banner

विज्ञान प्रदर्शन हे विद्यार्थ्यांच्या कल्पकता आणि कौशल्य व्यक्त करण्याचे माध्यम- आमदार अनिल पाटील


अमळनेर येथे ५२वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

अमळनेर: अमळनेर तालुक्यात शैक्षणिक हब निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागातून देखील शास्त्रज्ञ आणि विद्वान निर्माण होऊ शकतात. विज्ञान प्रदर्शन हे विद्यार्थ्यांच्या कल्पकता आणि कौशल्य व्यक्त करण्याचे माध्यम आहे असे प्रतिपादन आमदार अनिल पाटील यांनी अमळनेर तालुका विज्ञान प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. ललिता पाटील होत्या.अमळनेर पंचायत समिती शिक्षण विभाग व ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या संयुक्त विद्यमाने ५२ वे विज्ञान प्रदर्शन २६ रोजी आयोजित करण्यात आले होते. आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते शास्रज्ञाच्या प्रतिमांचे पूजन व हवेत बलून सोडून प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी केले. अध्यक्षीय मनोगतातून अॅड ललिता पाटील यांनी थॉमस एडिसन याची प्रेरणादायी कथा सांगितली. जिजाऊ बहुद्देशीय संस्था नेहमीच वैज्ञानिक घडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.प्राथमिक गटातून प्रथम - विश्वा पवार, प्राक्तन पाटील (ग्लोबल व्ह्यू स्कूल), द्वितीय गीतेश विकास निकम (सानेगुरुजी विद्यामंदिर), जयेश निंबा पाटील (आबासो एस एस पाटील माध्य. विद्यालय लोंढवे), उत्तेजनार्थ मयंक जगदीश साळुंखे (सेंट मेरी स्कूल), मोक्षदा बोरसे, समीक्षा बिहऱ्हाडे (डी आर कन्या शाळा) तर माध्यमिक गटातून प्रथम- अथर्व नवनीत बडगुजर (सेंट मेरी इंग्लिश मिडीयम सकूल), द्वितीय- अनुष्का पाटील, निकिता पाटील (अॅड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल), तृतीय - गणेश जोशी, देवेंद्र कोळी (नंदादीप माध्यमिक विद्यालय, निम) उत्तेजनार्थ – राकेश पारधी, मोहित कुंभार (शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे), मानसी नरेंद्र पाटील (माध्यमिक विद्यालय रणाईचे), शिक्षक गट प्राथमिक प्रथम - तसनीन बानो, शफीक अहमद (जि प उर्दूशाळा सारबेटे), द्वितीय रितीक शिखर जैन (ग्लोबल व्ह्यूव्ह स्कूल), शिक्षक माध्यमिक गट प्रथम -माधुरी भरत पाटील (जययोगेश्वर माध्यमिक विद्यालय), द्वितीय- पल्लवी रामकृष्ण पाटील (के पी सोनार माध्यमिक विद्यालय जैतपिर) यांना गटविकास अधिकारी एन आर पाटील, पोलीस निरीक्षक विकास देवरे, मुख्याधिकारी तुषार नेरकर, प्रा श्याम पाटील, पराग पाटील, देवेश्री पाटील , प्राचार्य नीरज चव्हाण यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र बक्षीस देण्यात आले. परीक्षक म्हणून कुंदन पाटील (देवगाव ता पारोळा), विजय मोरे साळवा ता धरणगाव, संजय पाटील कोळंबा ता चोपडा, भुपेंद्र पाटील हातेड ता चोपडा यांनी काम पाहिले. प्राचार्य नीरज चव्हाण व त्यांच्या सर्व सहकारी शिक्षक वृंद यांनी अतिशय सुंदर नियोजन केले. सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले.कार्यक्रमास प्राचार्य नीरज चव्हाण, गणित मंडळ अध्यक्ष डी ए धनगर, विज्ञान मंडळ अध्यक्ष निरंजन पेंढारे, कार्यध्यक्ष डी के पाटील, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, व्हाईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष उमेश काटे, केंद्र प्रमुख शरद सोनवणे, अशोक सोनवणे, दिलीप सोनवणे, चंद्रकांत साळुंखे, रवींद्र पाटील, गवते, किरण शिसोदे, ज्ञानेश्वर पाटील, मुख्याध्यापक एस एस बोरसे, मनोज पाटील, ज्ञानेश्वर इन्शुलकर हजर होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या