Type Here to Get Search Results !

Banner

अमळनेर येथे स्मृती चषक क्रीडा व बौद्धिक स्पर्धेचे बक्षीस वितरण


अमळनेर: विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक बळ व शारीरिक बळ वाढवण्यासाठी संस्थेने घेतलेल्या स्पर्धा फायदेशीर आहेत. पर्यायाने यामुळे सर्वागीण विकास साधणारी उज्वल पिढी भविष्यात तयार होणार असल्याचे मत माजी मदत पुनर्वसन मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केले. येथील नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित विजयनाना पाटील आर्मी स्कूल मध्ये झालेल्या खान्देश गौरव कै. रुख्मिणीताई स्मृती चषक क्रीडा व बौद्धिक स्पर्धेच्या बक्षिस वितरण प्रसंगी ते बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समितीचे संचालक ओम देशमुख हे अध्यक्षस्थानी होते. माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, भरत शेळके (नाशिक), एलआयसी चे विकास अधिकारी आर.बी पाटील, प्रशासकीय अधिकारी डी बी पाटील, प्रा. शाम पवार, बी टी पाटील, आर एन भालेराव, संजय एज्युकेशन सोसायटीचे संचालक सुनील पाटील, मानद शिक्षण संचालक प्रा. सुनील गरुड, मुख्याध्यापक व्ही जी बोरसे, कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील सह विविध शाळा महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला आर्मी स्कूलच्या छोट्या जवानांनी मान्यवरांना पथसंंचालनाद्वारे मानवंदना दिली. त्यानंतर स्वातंत्र्यसैनिक कै.नवलभाऊ व कै.रुख्मिणीताई यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. नवनिर्वाचित आमदार अनिल पाटील यांचा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. त्यानंतर अमळनेर येथील सावित्रीबाई फुले विद्यालय, आर्मी स्कूल यांच्यासह निंब, निंभोरा, पिंपळकोठा, रवंजे, नवलनगर, चिंचखेडा, फापोरे, सडावण, वेले येथील माध्यमिक विद्यालयांना विजयनाना स्पोर्ट्स अँड एडवेंचर क्लब तर्फे विविध क्रीडा साहित्यांचे किट देण्यात आले. प्रा सुनील गरुड यांनी प्रास्ताविक केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख उमेश काटे व शरद पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

यांचा झाला सन्मान 

मोहित मावळे (सहाय्यक भांडारपाल पदी निवड), निकिता पाटील (जिल्हा सत्र न्यायालय लिपिक पदी निवड), दीपक पारधी (सीआरपीएफ मध्ये निवड), शुभांगी पारखे (कुस्ती स्पर्धेत पंजाब येथे निवड), राजेश थोरात (गोळा फेक मध्ये राज्यस्तरावर निवड), नेहा झाल्टे (सीआरपीएफ मध्ये निवड), सुषमा सुलताने (राज्य उत्पादन शुल्क विभागात "कॉन्स्टेबल" म्हणून निवड), कुणाल पाटील-झाल्टे (सीआरपीएफ मध्ये निवड), आदित्य ताकमारे (कुस्ती स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर निवड), गणेश बारी (राष्ट्रीय स्तरावर उपविजेता) यांच्या सह ऑनलाईन सामान्य ज्ञान स्पर्धेचा निकाल प्राथमिक गट प्रथम- हेमांगी पाटील (पिंपळे), द्वितीय- हेमंत सैंदाणे (पिंपळे). माध्यमिक व उच्च माध्यमिक गट प्रथम- सजन भिल (नवलनगर), द्वितीय - जगदीश पाटील (नवलनगर), सीनियर गट प्रथम - नूतन धनगर (बी.एड कॉलेज अमळनेर), द्वितीय-कविता पाटील (रुख्मिणीताई महिला महाविद्यालय)
---
अमळनेर- नवनिर्वाचित आमदार अनिल भाईदास पाटील यांचा नागरी सत्कार करताना माजी मंत्री विजय नवल पाटील ओम देशमुख प्रा सुनील गरुड



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या