Type Here to Get Search Results !

Banner

शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना.सार्वजनिक विद्यालयात किशोर महोत्सवांतर्गत विविध गुणदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न



जळगांव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित. शेठ ला.ना.सा.विद्यालयात विद्यार्थ्यांचा आवडता कार्यक्रम विविध गुणदर्शन शुक्रवार दिनांक २०/१२/२०२४ रोजी अतिशय उत्साहात आणि जल्लोषात सादर झाला.. ह्या प्रसंगी शि. प्र.मंडळ सहसचिव सौ. मीराताई गाडगीळ, समन्वयिका सौ. विजयालक्ष्मी परांजपे, शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उप मुख्याध्यापक संजय भारुळे, पर्यवेक्षक संजय वानखेडे, प्रशांत जगताप सांस्कृतिक प्रमुख सौ. रेवती किन्हीकर उपप्रमुख श्रीमती संपदा छापेकर आणि विविध गुण दर्शन समिती प्रमुख संपदा छापेकर, ज्येष्ठ शिक्षिका सौ.सविता दातार उपस्थित होते..सौ. भारती गोडबोले आणि श्री. सारंग जेऊरकर ह्यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध गीते, नृत्य, तबला वादन सादर केले. संपदा छापेकर ह्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उल्हास ठाकरे, पांडुरंग सोनवणे आणि सोमनाथ शिंपी ह्यांनी साथ संगत केली. कार्यकारिणी सदस्य , पदाधिकारी ह्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.श्री.आनंद चौधरी ह्यांनी प्रास्ताविक तर सौ पद्मजा जोशी ह्यांनी आभार प्रदर्शन केले. सर्व शिक्षक बंधू भगिनी ह्यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या