जळगाव: जिल्ह्यात आज अवकाळी पाऊस बरसला. हवामान खात्याने या बाबत आधीच अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार दुपारी जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या ठिकाणी दि. 27 व 28 रोजी अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे आज सकाळपासूनच वातावरणात गारवा होता. दुपारी दोन वाजे नंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली. मात्र 2.55 वाजता पावसाने जोर पकडला. जळगाव शहरात जोरदार पाऊस बरसला.
पावसामुळे नागरिकांची चांगली धावपळ उडाली तर दुसरीकडे या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहून कृतीशिल उपाययोजना कराव्यात. हवामानाबाबत अधिकृत अपडेट्सद्वारे माहिती घ्यावी, आपत्तीत मदतीची गरज भासल्यास जळगाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात टोल फ्री १०७७ किंवा ०२५७-२२१७१९३ किंवा ०२५७-२२२३१८० या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या