Type Here to Get Search Results !

Banner

रविंद्र पाटील यांची जिल्हा न्यायालयात निवड


अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या करियर कौन्सिलिंग सेंटरचा विद्यार्थी रवींद्र सुदाम पाटील यांनी 2023 मध्ये मुंबई जिल्हा न्यायालयात शिपाई पदासाठी स्पर्धा परीक्षा दिली होती. या परीक्षेचा अंतिम सुधारित निकाल 12 जानेवारी 2025 रोजी जाहीर झाला,त्यामध्ये रवींद्र सुदाम पाटील (यादी क्रमांक 10) यांची मुंबई जिल्हा न्यायालयात शिपाई या पदावर निवड झाली आहे. रवींद्र सुदाम पाटील हा मूळचा नंदगाव या गावचा रहिवाशी असून तो अत्यंत गरीब,परिश्रम घेणारा अभ्यास विद्यार्थी म्हणून सर्वांना परिचित आहे. तो अर्थशास्त्र या विषयात पदवीधर आहे,सन 2015 ते 2025 या कालावधीत रवींद्र सुदाम पाटील यांनी करिअर कौन्सिलिंग सेंटरमध्ये बसून स्पर्धा परीक्षांची तयारी केली आहे, तो कमाईंड परीक्षा देखील देत आहे त्याच्या या यशाबद्दल प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य तथा खानदेश शिक्षण मंडळाची चिटणीस डॉ.अरुण जैन, सहचिटणीस डॉ.धीरज वैष्णव,डॉ.हर्षवर्धन जाधव, डॉ.आर सी सरवदे, डॉ.अमित पाटील, डॉ.कल्पना पाटील,डॉ.नलिनी पाटील, डॉ.वंदना भामरे, प्रा.वृषाली वाकडे,डॉ.माधव भुसनर,डॉ.रवी बाळसकर,प्रा.रोहन गायकवाड,डॉ.बालाजी कांबळे,यांच्यासह करिअर कौन्सिलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे, डॉ.जितेंद्र पाटील, श्री.दिलीप शिरसाट, पराग पाटील,प्रा.हिमांशू गोसावी, प्रा.अमोल आहीरे,विशाल अहिरे,अतुल धनगर आदींनी अभिनंदन केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या