मेळाव्यातून जीवन जगण्याची कला आणि आर्थिक व्यवहाराचे ज्ञान मिळते- मुख्याध्यापक एस डी मोरे
धरणगांव: तालुका धरणगाव येथील साळवे इंग्रजी विद्यालय व पूज्य साने गुरुजी प्राथमिक सेमी विद्यालयामध्ये आनंद मेळावा अतिशय उत्साहात संपन्न झाला. इयत्ता पहिलीपासून ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे स्वादिष्ट पदार्थ बनवून, उत्कृष्ट चवीचे पदार्थ खाण्यासाठी खवय्यांनी, पालकांनी, विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आनंद घेतला.
विद्यार्थ्यांनी पोहे, पोंगा-बटाटे, कढण्याच्या भाकरी, आंबाड्याची भाजी, लसणाची चटणी, समोसे, पुरणाच्यापोळया, अंडाभुर्जी, भेळ-भत्ता असे वेगवेगळे स्वादिष्ट, चविष्ट पदार्थ बनवून अल्पशा किमतीत विक्री करून आनंद घेतला, स्वतःही चहा नाश्ता करून पोटभर जेवण करून अतिशय उत्साहात मेळाव्यामध्ये सहभाग घेतला. अनेक पालकांनी पदार्थ बनवण्यासाठी सहकार्य केले. सर्व वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व मदत केली. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सहकार्य केले. अतिशय उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या