अमळनेर: दि 22 जानेवारी 2025 रोजी अमळनेर येथील लोकमान्य शिक्षण मंडळाच्या लोकमान्य विद्यालय, नवीन मराठी शाळा व बालविकास मंदिर या तीनही शाळांच्या आनंद मेळावा उत्साहात पार पडला. यात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. ह्या मेळाव्यात जवळ जवळ 25 स्टॉल धारकांनी वेगवेगळे खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले होते. या आनंद मेळाव्याचे उद्घाटन मा. डॉ. निखिल रमेश बहुगुणे व त्यांच्या पत्नी सौ. प्राजक्ता बहुगुणे यांच्या हस्ते झाले. तर पर्यवेक्षक म्हणून भारतीताई सोनवणे यांनी काम पाहिले. उद्घाटन प्रसंगी लोकमान्य शिक्षण मंडळाचे चिटणीस विवेकानंद भांडारकर, कार्यकारी संचालक प्रा.डॉ.पी.जे. जोशी, कार्यकारी संचालक प्रा.र.रा.बहुगणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.अरविंद फुलपागरे, नवीन मराठी शाळेचे चेअरमन आर.पी.नवसारीकर, लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर महाजन, नवीन मराठी शाळेचे मुख्याध्यापक मच्छिंद्र मोरे, बालविकास मंदिराचे मुख्याध्यापक अनिता वैद्य तसेच तिनही शाळांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवीन मराठी शाळेचे उपशिक्षक मकरंद निळे यांनी केले. आनंद मेळावा यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या