Type Here to Get Search Results !

Banner

शेठ ला.ना.सा.विद्यालयात सामूहिक वाचन व राष्ट्रीय बालिका दिवस साजरा


जळगांव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना.सा.विद्यालयात शुक्रवार दिनांक ३ जानेवारी 2025 रोजी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती राष्ट्रीय बालिकादिन म्हणून साजरी करण्यात आली.तसेच वाचन संकल्प महाराष्ट्राचा या शासकीय उपक्रमाअंतर्गत विविध पुस्तकांचे सामूहिक वाचन 500 विद्यार्थ्यांद्वारे करण्यात आले.या कार्यक्रमाच्या सुरुवातीस इयत्ता 6 वी ब मधील शालेय परिपाठ सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते  विद्येची देवता सरस्वती माता प्रतिमा तसेच आद्यशिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्ल्यारपण करण्यात आले.याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे उपमुख्याध्यापक श्री.संजय  भा रुळे,पर्यवेक्षक श्री.संजय वानखेडे जेष्ठ शिक्षिका सौ. विनया झाडगावकर,सौ.मंगला भा रुळे ,वर्गशिक्षिका सौ.स्वाती एडके  उपस्थित होते. यावेळेस साप्ताहिक शालेय परिपाठातील सहभागी विद्यार्थ्यांनी गणपती स्त्रोत्र, सुविचार, दिनविशेष, बातम्या, महाराष्ट्र गीत, देशभक्तीपर गीत, बोधकथा, शास्त्रज्ञांची कथा तसेच क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची माहिती सादर केली. या प्रसंगी वाचन संकल्प महाराष्ट्राचा या शासकीय उपक्रमाअंतर्गत  500 विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे सामूहिक वाचन केले.या वेळेस विद्यार्थी आदित्य सोनवणे, कोशिका चौधरी, गौरव  व शाळेचे उपमुख्याध्यापक श्री.संजय भारुळे यांनी  सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती सांगून विद्यार्थांनी उच्च  शिक्षण घेण्याचे आवाहन केले. तसेच पर्यवेक्षक श्री.संजय वानखेडे यांनी वाचनाचे महत्व स्पष्ट करून विद्यार्थांनी अवांतर वाचन करून ज्ञान संपादन करण्याचे व व्यक्तिमत्व विकास करण्याचे सांगितले.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 6वी तुकडी ब मधील विद्यार्थीनी रिद्धी धनगर, कुमुद चव्हाण यांनी तर आभारप्रदर्शन योगिता वाणी हिने केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींचे सहकार्य लाभले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या