Type Here to Get Search Results !

Banner

ललिता राजेंद्र वाघ यांच्याकडून शाळेतील मुला-मुलींना "आदर्श महामाता" ग्रंथाचे वितरण !


सावित्रीमाई फुले यांच्यामुळेच आजची महिला स्वाभिमानाने जगत आहे : राजेंद्र वाघ [ RTI जिल्हाध्यक्ष ] 

धरणगांव - शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे ३ जानेवारी सावित्रीमाई फुले यांचा जन्मोत्सव निमित्ताने 'महिला शिक्षण दिन ', 'महिला मुक्ती दिन' व 'बालिका दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
        भारतातील थोर समाज सुधारक देशातील पहिल्या मुख्याध्यापिका शिक्षिका कवयित्री सत्यशोधिका सावित्रीबाई फुले यांचे कार्य समस्त महिलांसाठी प्रेरणादायी असून आज महिला सन्मानाने जगत आहे ती केवळ ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्यामुळेच !. असे प्रतिपादन ललिता राजेंद्र वाघ यांनी केले. आज रोजी महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेतील सर्व मुलींना ललिता राजेंद्र वाघ यांच्याकडून पी डी पाटील लिखित "आदर्श महामाता " हा ग्रंथ भेट स्वरूपात देण्यात आला. सर्व मुलींनी या ग्रंथाचे वाचन करावे व राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, राजमाता अहिल्यामाई होळकर, सावित्रीमाई फुले, फातिमाबी शेखव त्यागमूर्ती माता रमाई या सर्व महामातांचा आदर्श घेऊन मार्गक्रमण करावे. असे प्रतिपादन वाघ यांनी केले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या