Type Here to Get Search Results !

Banner

खा.स्मिता वाघ यांनी घेतला अमळनेर रेल्वे स्थानक आधुनिकीकरणाचा आढावा


प्रत्यक्ष सुरू असलेल्या कामांची केली पाहणी

अमळनेर : अमृत भारत योजनेअंतर्गत अमळनेर रेल्वे स्टेशन येथे सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी खासदार स्मिता वाघ यांनी भेट देऊन स्टेशन आधुनिकीकरण कामांचा आढावा घेतला.
         यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांकडून खासदार वाघ यांनी होत असलेल्या सर्व कामांचा आढावा घेतला. तिकीट घर,नवीन प्रशासकीय रेल्वेची इमारत तसेच बंगाली फाईल कडून नवीन अतिरिक्त प्रवेशद्वार, प्रवाश्यांसाठी लिफ्टची व्यवस्था आदी कामांचा आढावा त्यांनी घेतला.तसेच काही महिन्यांपूर्वी धार उरुस प्रसंगी झालेल्या दगडफेक व चेन पुलिंग संदर्भात किती आरोपी अटक झालेत ,त्यातील बाकी आरोपी नाबालिक होते त्यासंदर्भात चार्जशीट दाखल झाले का याचा देखील त्यांनी आढावा घेतला. तसेच तांबापुर व भरवस येथील बोगदा संदर्भात चर्चा करून नवीन मोठा रस्ता तयार करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी अधिकारी वर्गास दिले.
     
        रेल्वेचे ए ई एन संजय गुप्ता,आय पी एफ सत्यजीत कुमार, इंजि पंकज हारेकर, प्रबंधक अनिल शिंदे, वाणिज्य निरीक्षक रवि पांडे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली,यावेळी खासदार वाघ यांनी काही कामांबाबत सूचना देखील केल्यात.यावेळी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या