Type Here to Get Search Results !

Banner

अमळनेर नगरपरिषदेतर्फे १ ते ७ दरम्यान महास्वच्छता अभियान चे आयोजन

 
अमळनेर : भारतीय प्रशासन सेवेतील नवनियुक्त प्रशिक्षणार्थी वेवोतोलू केजो यांची अमळनेर नगर परिषदेत नुकतीच मुख्याधिकारी पदावर नियुक्ती झालेली असून पदभार स्वीकारताच नगर परिषदेतील सर्व विभागांचा आढावा व पाहणी करण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता अभियान अंतर्गत दिनांक ०१ ते ०७ जानेवारी दरम्यान अमळनेर शहरातील प्रभागात महास्वच्छता अभियान (Deep Clean Drive) राबविण्यात येणार आहे.
     सदर अभियान अंतर्गत १ रोजी शहरातील कृषिभूषण मार्ग, तिरंगा चौक, चोपडा नका परिसर, बस स्टेशन रोड, नगर परिषद कार्यालय परिसर ई. परिसरात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या प्रसंगी श्रींम. वेवोतोलू केजो, (भा.प्र.से.) मुख्याधिकारी , नगर परिषद , अमळनेर तसेच उपमुख्याधिकारी रवींद्र चव्हाण, स्वच्छता निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, स्वच्छता निरीक्षक किरण कंडारे, प्रभाग मुकादम व स्वच्छता कर्मचारी, नागरिक ई. मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान शहरातील मुख्य रस्ते, दुभाजक, बोरी नदी पात्र परिसर, मुख्य चौक, कार्यालय परिसर ई. स्वच्छ करण्यात आले. मुख्याधिकारी श्रींम. वेवोतोलू केजो यांनी उपस्थित राहून अभियान अंमलबजावणीची पाहणी करण्यात आली. तसेच सदर अभियान अंमलबजावणी कामी शहरातील नागरिक, विध्यार्थी, बचत गट, विविध स्वयंसेवी संस्था, शाळा/महाविद्यालय, आस्थापना, राजकीय नेते, अधिकारी, कर्मचारी ई. सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व अभियान अमलबजावणी कामी सहकार्य करून आपला सहभाग नोंदवून आपला परिसर स्वच्छ, सुंदर बनविण्यास हातभार लावावा, असे जाहीर आवाहन अमळनेर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वेवोतोलू केजो (भा.प्र.से.) यांनी केले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या