Type Here to Get Search Results !

Banner

आरोग्य आणि स्वच्छता प्रकल्प तंबाखू मुक्त शाळा अभियान

जळगांव जिल्ह्यातील शंभर शाळांचा समावेश

अमळनेर: आज रोजी पातोंडा येथे श्री दत्त विद्या मंदिर हायस्कूल येथे सलाम मुंबई फाउंडेशन व व आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने शालेय विद्यार्थी व  विद्यार्थिनी सोबत जाणीव जागृती अभियान राबविण्यात आले. सलाम मुंबई फाऊंडेशनचे अधिकारी राकेश कासारे  तसेच आधार संस्थेचे समन्वयक दिपक संदानशिव, मुरलीधर बिरारी, तोसिफ शेख यांनी तंबाखूमुक्त शाळा अभियान या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांसोबत तंबाखूचे दुष्परिणाम, तंबाखू मुळे होणारे विविध आजार तसेच तंबाखू मधील वापरलेली रसायने व त्याचे शरीरावरील दुष्परिणाम यासंदर्भात राकेश कासारे  यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना विविध प्रश्नांच्या माध्यमातून यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला मुरलीधर बिरारी यांनी विद्यार्थ्यांना गाव पातळीवरील नागरिकांसोबत तसेच पान टपरी वाले यांच्यासोबत विद्यार्थ्यांनी कोणत्या पद्धतीने जनजागृती करावी यावर मार्गदर्शन केले. तसेच आपल्या कुटुंबातील, नातेवाईक मंडळी यांना विद्यार्थ्यांकडून कशा पद्धतीने संवाद साधता येईल व तंबाखू सोडवण्याची पद्धती यावर मार्गदर्शन केले.

         त्याप्रसंगी विद्यार्थ्यांनी गावात महिला पुरुष व गावातील तरुण मंडळी यांच्यासोबत संवाद साधून त्यांच्यासोबत जनजागृती करण्याचा प्रयत्न देखील केला. या कार्यक्रम प्रसंगी शाळेतील विद्यार्थी हर्षल पाटील ,जयेश माळी, हर्षल कैलास पाटील, धनश्री मोतीराळे, दिया संदानशिव, दिव्या पवार, प्रणाली पाटील, रितेश पवार, अक्षरा साळुंखे, अंकिता लांबोळे, जितेश पाटील, हर्षदा पाटील या विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट प्रतिसाद मिळालं व तंबाखू वरील दुष्परिणाम  प्रतिक्रिया जाणून घेतल्या. या कार्यक्रम प्रसंगी श्री दत्त विद्या मंदिर पातोंडा शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप शिंगाणे सर, पर्यवेक्षक व्ही सी. पाटील सर, शिक्षक अमित पवार सर, बी. के मोरे सर, महेंद्र पाटील सर, छाया संदानशिव मॅडम, सुनंदा पारधी मॅडम, प्रदीप लोहारे सर, डी. के. पाटील सर, ललित पवार सर, शरद सोनवणे सर, एम बी. पाटील सर, किशोर पाटील, अनिल बिरारी, अतुल पवार, राजू संदानशिव, चेतन पवार यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या