जळगाव: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव जिल्हा परिषद जळगाव महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघ द्वारा जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांसाठी एक दिवसीय जिल्हास्तरीय क्रीडा प्रशिक्षणाचे जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री रविंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
प्रशिक्षण उदघाटन वेळी श्री अनिल झोपे प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव हे अध्यक्ष स्थानी होते शिक्षकांनी क्रीडा प्रशिक्षणातून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास साधावा असे सांगितले व या नावीन्यपूर्ण उपक्रमात स्वयंप्रेरणेने सहभागी शिक्षकांचे कौतुक केले, प्रमुख अतिथी श्री विकास पाटील शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद जळगाव यांनी खेळाकडून गुणवत्तेकडे विद्यार्थ्यांना न्यावे असे आपल्या मनोगतात सांगितले. क्रीडा कार्यालयातील श्री सुरेश थरकुडे व मिनल थोरात क्रीडा अधिकारी प्रसंगी उपस्थित होते. योग विषयक मार्गदर्शन करताना आंतरराष्ट्रीय मार्गदर्शिका अनिता पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकासह शिक्षक व विद्यार्थी यांना उपयुक्त योग क्रिया करवून दाखवल्या. श्री सत्यनारायण पवार यांनी वॉर्म अप , फिटनेस ॲक्टिव्हिटी, कुलिंग डाऊन आदी विषयी मार्गदर्शन प्रात्यक्षिकासह करवून घेतले. शिक्षकांनी अतिशय उत्साहात सहभाग घेतला. श्री जयांशु पोळ राज्य सहसचिव महाराष्ट्र खो खो असोसिएशन यांनी खो खो खेळ व नियमाविषयी मार्गदर्शन करताना प्राथमिक शाळांसाठी विद्यार्थ्यांना आवश्यक बाबी कृतिसह करवून दाखवल्या. श्री मिनल थोरात क्रीडा मार्गदर्शक सर यांनी खो खो खेळाचे मार्गदर्शन करताना विविध बाबी स्पष्ट केल्या. श्री प्रशांत कोल्हे सर यांनी कब्बडी खेळाचे नियम व डावपेचाचे मार्गदर्शन केले प्राथमिक स्तरावर कब्बडी साठी पूर्वतयारी कशी घ्यावी याची माहिती दिली. श्री राजेश जाधव सर उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशन यांनी प्राथमिक साठी असणारे ॲथलेटिक्स चे इव्हेंट त्यांची मैदाने विविध स्पर्धा याविषयी मार्गदर्शन केले. श्री सुरेश थरकुडे क्रीडा मार्गदर्शक यांनी पूरक खेळ व मनोरंजक खेळ याचा प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा गुण विकासासाठी कसा वापर करता येईल या विषयी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमातील प्रशिक्षणार्थींना स्नेह भोजन व्यवस्था महासंघ राज्य सदस्य श्री टि के पाटील सर यांनी केली तर प्रशिक्षणासाठी साहित्य श्री महेश पाटील सर ग स संचालक यांनी उपलब्ध करून दिले .श्री अजित चौधरी , गोविंदा लोखंडे व गणेश लोडते सर यांचे ही आर्थिक सहकार्य लाभले त्याबद्दल त्यांचे महासंघ ऋणी राहील. तसेच नियोजन व्यवस्थे साठी व पूर्वतायरी साठी श्री अशोक मदाने सर, देवेंद्र चौधरी, प्रफुल्ल सरोदे, निलेश मोरे, सुनिल पवार , शाकीर अहमद , सोमनाथ लोखंडे ,महेश तायडे, प्रमोद झलवार , मिलिंद नाईक , जितेंद्र झांबरे, प्रशांत आंभोरे , आदींनी सहकार्य केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अजित चौधरी सूत्रसंचालन राहुल चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन निलेश मोरे, गणेश लोडते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महासंघाच्या सर्व पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या