अमळनेर: येथील लोकमान्य विद्यालयाचे कलाशिक्षक (मुख्याध्यापक) क्षत्रिय काच माळी समाज अमळनेर चे अध्यक्ष, विद्यार्थी प्रिय कला शिक्षक श्री.मनोहर भगवान महाजन सर यांना कलाक्षेत्रातील, सामाजिक, शैक्षणिक कार्याबद्दल अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कलाशिक्षक संघाकडून दि.९ फेब्रुवारी २०२५ रोजी पंढरपूर जि.सोलापुर येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशन (कलाशिक्षण परिषद) येथे "राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कार २०२५" मा.श्री.दतात्रय सावंत (मा.शिक्षक आमदार) यांच्या हस्ते मा.श्री.शेरशाह डोंगरी, सोलापूर, मा.श्री.शालिग्राम भिरुड जळगाव व महाराष्ट्रातील कलाशिक्षकांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सरांचे मा.श्री.विवेकानंद भांडारकर चिटणीस लो.शि.मंडळ, मा.श्री.प्रा.डाॅ.प्र.ज.जोशी, मा.श्री.धर्मसिंह पाटील, लोकमान्य विद्यालय शिक्षक-शिक्षकेतर वृंद, समाजस्तरातील अनेक मान्यवर यांच्या कडुन अभिनंदन होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या