Type Here to Get Search Results !

Banner

ईसे यांना साने गुरुजी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 

ईसे यांना साने गुरुजी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 

अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथील जिल्हा परिषद शाळेतील आदर्श शिक्षक अशोक शांताराम ईसे व मठगव्हाण-नालखेडा जिल्हा परिषद शाळेतील आदर्श शिक्षिका छाया अशोक ईसे यांना मोझरी (जि.अमरावती) येथील अखिल भारतीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुकुंज आश्रमातर्फे शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिला जाणारा सन्मानाचा 'पुज्य साने गुरुजी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार' प्रदान करण्यात आला. जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ईसे यांना हा पुरस्कार ट्रस्टच्या जिल्हा मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अध्यापनासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते विविध उपक्रम राबवतात, त्यांच्या या कार्याची दखल घेऊन यापूर्वीही अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. त्यांच्या या पुरस्काराबद्दल त्यांचे अधिकारी, सहकारीमित्र, विद्यार्थी व समाजातून कौतुक होत आहे. ते अमळनेर येथील रहिवाशी आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या