Type Here to Get Search Results !

Banner

कोरोना मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५० हजार मिळणार ! 

कोरोना मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५० हजार मिळणार ! 


देशात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. गेल्या दीड वर्षात कोरोनाने लाखो लोकं बाधित झाले आहेत तर मृत्यू झालेल्यांची संख्या देखील मोठी आहे. अनेक कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याने या कुटुंबियांसमोर उदर निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.अशा कुटुंबांना मदत करण्यासाठी आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला ५० हजार रुपयांची मदत केली जाणार असल्याचे मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून ही रक्कम देण्यात येणार असल्याचे सरकारकडून न्यायालयाला सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी सातत्याने केंद्र सरकारला विचारणा केली होती. अखेर आता केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला महत्त्वाची माहिती दिली आहे. देशात आतापर्यंत जवळपास ४ कोटी लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या