Type Here to Get Search Results !

Banner

माध्यमिक विद्यालय शिंदी येथे शिक्षणोत्सव सोहळा संपन्न

माध्यमिक विद्यालय शिंदी येथे शिक्षणोत्सव सोहळा संपन्न

शिंदी, ता.भडगाव: कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलीत, माध्यमिक विद्यालय शिंदी ता.भडगाव येथे आज दि.४/१०/२०२१ सोमवार रोजी विद्यार्थी शिक्षणोत्सव सोहळा संपन्न झाला. कोरोनामुळे प्रदीर्घ कालावधीपासून बंद असलेली शाळा शालेय परीपत्रकानुसार आज पासून सुरु करण्यात आली. याप्रसंगी शालेय परिसर स्वच्छ व सुशोभित करण्यात आला होता. शालेय परीसरात विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक दादासो ए.एस.पाटील सर यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यानंतर विज्ञान शिक्षक अश्विन पाटील सर यांच्याकडून विद्यार्थ्यांना शाळेत मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर याचे पालन करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या. तदनंतर शाळेचे मुख्याध्यापक दादासाहेब ए.एस.पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना अधिकाधिक संख्येने शाळेत उपस्थित राहण्यासाठी आवाहन केले. तसेच सदरील कार्यक्रमाला विशेष मार्गदर्शन म्हणून भडगाव पंचायत समिती तर्फे विशेष शिक्षक माने साहेब यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. 

तसेच सदर कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन आदरणीय नानासाहेब प्रतापराव पाटील, संस्थेचे संचालक आदरणीय दादासाहेब प्रशांतराव पाटील, संस्थेच्या सचिव आदरणीय डॉ.ताईसाहेब पुनम पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. सदरील कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या