Type Here to Get Search Results !

Banner

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री मा.ना.धनंजयजी मुंडे यांच्या हस्ते अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचे उद्घाटन!


अमळनेर प्रतिनिधी: मा.ना.धनंजयजी मुंडे (Dhananjay Munde) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) कार्यालय उद्घाटन झाले त्यावेळी अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी त्यांच्या प्रास्ताविकात बोलताना म्हटले की, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माझ्या विरोधात होते व त्यांच्याकडे पैसा पण भरपूर होता पण माझ्याकडे कार्यकर्तोची अफाट संपत्ती होती. म्हणून आजचा हा सोन्याचा दिवस पाहायला मिळाला. त्यासोबत पक्ष प्रमुखांचा विश्वास व मंत्रीमहोदयांच्या सहकार्याने अजुन विकासासाठी झटेन आणि माझ्या पक्ष कार्यकर्तोच्या विश्वासामुळे व बाळावर आज अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचे उद्घाटन झाले. त्यानंतर  मा.ना.श्री.धनंजय मुंडे यांनी त्यांच्या भाषणात म्हटले की जळगाव (Jalgaon) जिल्ह्यासह अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मजबूत बालेकिल्ला आहे. या कार्यालयात सर्व लोकांचे प्रश्न सोडवण्याचे काम आमदार अनिल भाईदास पाटील करतील. आम्ही लोकप्रतिनीधी म्हणुन त्यांना सदैव सहकार्य करु व अमळनेर तालुक्याच्या विकास करू अशी ग्वाही दिली. आमचे पक्ष प्रमुख मा. शरद पवार साहेब (Sharad Pawar) यांनी श्री अनिल भाईदास पाटील यांना आमदार पदासाठी संधी दिली व त्यांनी त्याचे सोने केले.
त्याप्रसंगी कर्यक्रमाला मा.प्रा.अरुणभाई गुजराथी (माजी विधानसभा अध्यक्ष), अविनाशजी आदिक (निरीक्षक जळगाव जिल्हा), गुरुमुख जगवाणी (माजी आमदार विधानपरिषद), मा.कृमिभूषण साहेबरावदादा पाटील(माजीआमदार अमळनेर), अरुणदादा पाटील (मा.आमदार रावेर), मा.हाजी एजाज मलिक (सरचिटणीस, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष), मा.एकनाथरावजी खडसे (Eknath khadase) (माजी मंत्री महाराष्ट्र राज्य), मा.गुलाबराव देवकर (अध्यक्ष जिल्हा बँक), मा.अॅड.रविंद्र भैय्या पाटील, मा.मनीषदादा जैन, माजी आमदार मा.दिलीप वाघ, माजी आमदार दिलीप सोनवणे, मा.संजय गरुड मा.वंदनाताई चौधरी, मा.उमेशदादा पाटील, मा.शिवाजीराव पाटील, मा.डॉ.सतीश पाटील माजी मंत्री महाराष्ट्र राज्य, मा.वसंतराव मोरे (माजी खासदार), मा.राजीव देशमुख, माजी आमदार मा.कैलासबापू पाटील, मा.संतोषभाऊ चौधरी, मा.संजयबापू पवार, मा.योगेशभाऊ देसले, मा.सौ.रोहिणीताई खडसे, मा.सौ. तिलोत्तमाताई पाटील, मा.भूषणदादा भदाणे आदी राष्ट्रवादी कॉग्रेसचे पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत व जल्लोषात हा सोहळा पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या