Type Here to Get Search Results !

Banner

जयेश व निर्भय सोनार यांनी गाजविली साने गुरुजी वाचनालयाची वक्तृत्व स्पर्धा!


जयेश व निर्भय सोनार यांनी गाजवली सानेगुरुजी वाचनालयाची वकृत्व स्पर्धा, वकृत्व स्पर्धेत जयेश प्रथम तर निर्भय द्वितीय, मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस देऊन झाला सन्मान

जयेश व निर्भय सोनार यांनी गाजविली साने गुरुजी वाचनालयाची वक्तृत्व स्पर्धा!

वक्तृत्व स्पर्धेत जयेश प्रथम तर निर्भय सोनार द्वितीय!

अमळनेर प्रतिनिधी: अमळनेर येथील सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय संचलित सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रताप महाविद्यालयाचे (Pratap College) विद्यार्थी जयेश संजय सोनार व निर्भय धनंजय सोनार यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला! अमळनेर पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांचे हस्ते त्यांना रोख रक्कम व मानपत्र देऊन गौरविण्यात आले!
कोरोना (Covid) काळाच्या दीर्घ कालावधीची बाधा आल्या नंतर घरात बंद असलेल्या तरुणाईला चैतन्य प्रदान करणारा हा सानेगुरुजी (Saneguruji) वाचनालयाचा उपक्रम चर्चेत आला !
जयेश संजय सोनार व निर्भय धनंजय सोनार याने मिळविलेल्या या यशा बद्दल प्राचार्य शिरोडे, प्रा डॉ नितीन पाटील, प्रा डॉ संदीप नेरकर, प्रा डॉ रमेश माने, प्रा डॉ लीलाधर पाटील, डिगंबर महाले, डॉ जि. एम. पाटील, अडव्होकेट सारांश सोनार, प्रा. पराग पाटील, उपप्राचार्य उल्हास मोरे, सचिन खंडारे, रवींद्र विसपुते, महेश निकुंभ, श्याम सोनार, विशाल विसपुते, सुमित विसपुते, संदीप घोरपडे, प्रदीप देशमुख, वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, चिटणीस प्रकाशजी वाघ, विश्वस्त बापू नगावकर, संचालक भिमराव जाधव, सुवर्णकार समाज व पत्रकार बांधवांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या