प्रतिनिधी: अमळनेर संत सखाराम महाराज यात्रोत्सवानिमित्त लालाजींच्या रथाची भव्य मिरवणूक निघाली. संपूर्ण खान्देशाचे आकर्षण असलेला रथोत्सव काल मोहिनी एकदशीला 12 मे गुरुवार रोजी पार पडला. लालजी म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांची मूर्ती या रथात सामावालेली असते. संस्थानच्या मंदिराजवळून मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी परंपरेप्रमाणे पहिली मोगरी लावण्याच्या मान मुस्लिम समाज बांधवाना मिळाला. या परिसरात ३६ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. यात्रा परिसर, रथ मार्ग व पालखी मिरवणूक यासह यात्राकाळात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल. यात्रेत केली जाणारी छेडखानी, चोरांवर याद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. कोरोनाकाळानंतर तब्बल दोन वर्षानंतर रथोत्सव असल्याने रथाचे दर्शन घेण्यासाठी अमळनेरवासी प्रचंड संख्येने उपस्थित होते. रात्री जवळ-जवळ 11 वाजेच्या सुमारास रथ सराफ बाजारात पोहोचला होता. त्यामुळे भाविकांची त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
रथोत्सव पार पडल्यानंतर यात्रा सुरु होत असते, त्यामुळे दुकानदारांची दुकाने लावण्यासाठी लगबग सुरु आहे. १६ मे सोमवार रोजी सकाळी सहा वाजता पालखी मिरवणूक निघणार आहे. यावर्षीच्या रथोत्सवात खास आकर्षण म्हणजे नाशिक, बागलाण येथील आदिवासी बांधवाचे नृत्य, आदिवासी कला पथकांनी आपली वैशिष्ट्यपूर्ण कला सादर केली.
रथोत्सव पूजन सौ.मयुरी अनिकेत देेव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, नगरसेवक प्रवीण पाठक, भाजप शहराध्यक्ष उमेश वाल्हे, नगरसेवक राजेश पाटील नरेंद्र संदांनशिव, निलेश भांडारकर महेश कोठावदे, प्रभाकर वाणी, किरण गोसावी, अनील महाजन, संजय पाटील, मनोज भांडारकर, अॅड केदार ब्रह्मे, डॉ.मिलिंद वैद्य, बंडू देशमुख, अर्बन बँकेचे शुक्ल, सुरज परदेशी उदय देशपांडे, प्रविण जैन, बाळू पाटील, दिनेश सोनवणे, गणेश महाजन, अप्पा येवले, उदय देशपांडे, मुक्तार खाटीक, जितेंद्र जोगी, अभिजित भांडारकर, विश्वस्त रवींद्र देशमुख, दिलीप देशमुख उपस्थित होते.
( बातमी किंवा फोटो काॅपी केल्यास काॅपिराईट कायदा 1957 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल, हे तुला शेवटचे सांगणे आहे. )
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या