Type Here to Get Search Results !

Banner

उद्या अमळनेर येथे संत श्री सखाराम महाराज यांच्या रथोत्सव!


अमळनेर प्रतिनिधी: श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थान अमळनेर चे गादी वारस प.पू.प्रसाद महाराज यांचे आज अमळनेर येथे आगमन झाले. उद्या मोहीनी एकादशीला अर्थात १२ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता रथाची वाडी संस्थानातून मिरवणूक निघणार आहे. आज रथोत्सवासाठी मोठ्या उत्साहाने तयारी सुरु झाली आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून यात्रोत्सव झाला नाही, त्यामुळे यावर्षी लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यावर्षीची रथाची मिरवणूक ही वैविध्यपूर्ण असणार आहे. यावर्षी रथोत्सवात खास आदिवासी बांधव नृत्य करणार असून नाशिक, बागलाण येथील आदिवासी कला पथके आपली वैशिष्ट्यपूर्ण कला सादर करणार आहेत.

रथ मिरवणूकीचा मार्ग वाडी संस्थान- सराफ बाजार- दगडी दरवाजा- जुना फरशीपूल- पैलाड- पुन्हा जागेवर वाडी संस्थान

रथोत्सवानंतर १६ मे सोमवार रोजी सकाळी सहा वाजता पालखी मिरवणूक निघेल. उद्या रथोत्सव संपन्न झाल्यानंतर संत श्री सखाराम महाराज यात्रेत भाविकांची रेलचेल दिसून येईल तरी सर्वांनी यात्रेचा व दर्शनाचा लाभ घ्यावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या