अमळनेर प्रतिनिधी: अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणारी पीक विम्याची रक्कम तातडीने देण्यात यावी अशी मागणीचे निवेदन अमळनेर येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिले आहे. पीकविम्याची अग्रीम रक्कम मिळाली असली, तरी ७५ टक्के जोखीम रक्कम मात्र अजूनही मिळालेली नाही . ही रक्कम कधी मिळेल या चिंतेत अमळनेर तालुक्यातील शेतकरी आहेत. विमा कंपनीचे प्रतिनिधी उडवाउडवीची उत्तरे देत जोखीम रक्कम मिळत नाही असे सांगतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. केंद्र आणि राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांची रक्कम देण्याबाबत अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. आपल्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारपर्यंत शेतकऱ्यांची व्यथा मांडावी व उर्वरित 75 टक्के अग्रीम रक्कम तात्काळ मिळवून देत दिलासा द्यावा असे या निवेदनात नमूद केले आहे. निवेदन मा.जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले. निवेदन देताना शिवाजी पाटील, दिलीप पाटील, मधूकर पाटील, ज्ञानेश्वर पवार, रवींद्र पाटील, पंढरीनाथ पाटील, सुधाकर पाटील, सुरेश लोहार, राजाराम ठाकरे, रवींद्र पाटील, सुरेश शिंदे, आनंदा पाटील, सुनील पाटील, आत्माराम धनगर, नंदकिशोर शिसोदे, कांतीलाल चौधरी, अरविंद शिसोदे, बाबुराव पाटील, रमेश बडगुजर, भास्कर पाटील, हिरामण चव्हाण, पंकज कोळी, चिंधू महाजन, काळू कुरेशी, ज्ञानेश्वर बडगुजर, अशोक लोहार, भगवान पाटील, विठ्ठल बेलदार, प्रकाश चौधरी, आत्माराम बडगुजर, रघुनाथ पाटील आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या