Type Here to Get Search Results !

Banner

व्हॉट्सअ‍ॅपचे रिअ‍ॅक्शन फीचर आजपासून सुरु!


मेटा(facebook) चे असलेले रिअलटाईम मेसेजिंग अ‍ॅप म्हणजे व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फिचर म्हणजेच रिअ‍ॅक्ट फीचरची बर्‍याच दिवसांपासून टेस्ट केली जात होती. मात्र आता युजर्सची प्रतीक्षा अखेर संपली आहे.

मेटा (facebook) चे सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी एका पोस्टद्वारे सांगितले की व्हॉट्सअ‍ॅप रिअ‍ॅक्शन्स फीचरचे अपडेट आज 5 मे पासून सुरु होत आहे. नवीन अपडेट आल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप युजर्स फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या कोणत्याही संदेशावर इमोजी प्रतिक्रिया देखील देऊ शकतात. युजर्संना व्हॉट्सअ‍ॅपवर like, love, laugh, surprise, sad आणि thanks असे एकूण सहा इमोजी पहायला मिळतील. 


● मेसेज प्रतिक्रिया (reaction) कसे द्याल ?

• सर्वात आधी तुमचे व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) अपडेट करा.

• नंतर अ‍ॅप ओपन करा आणि तुम्हाला ज्या संदेशावर प्रतिक्रिया द्यायची आहे तो सिलेक्ट करा.

• नंतर त्या मेसेजला काही सेकंद दाबून धरा.

• नंतर तुम्हाला त्याठिकाणी ६ इमोजी दिसतील, त्यापैकी जी प्रतिक्रिया द्यायची असेल तिचा टॅप करा.

-Copyright © Bhushan Mahale 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या