Type Here to Get Search Results !

Banner

अमळनेरात संत सखाराम महाराज यात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ!


अमळनेर प्रतिनिधी: कोरोनामुळे दोन वर्षाच्या कालावधीनंतर यंदा खान्देशातील सुप्रसिद्ध प्रतिपंढरपूर संत सखाराम महाराजांच्या यात्रोत्सवाला आज ३ मे पासून प्रारंभ करण्यात आला. शहराचा सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक वैभव असलेला हा सोहळा बोरी नदीच्या पात्रात आठवडाभर सुरू राहणार आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बोरी नदी पात्रात समाधी समोर स्तंभारोपण व ध्वजरोहण करण्यात येऊन प्रारंभ झाला. ह.भ.प प्रसाद महाराज यांच्या हस्ते विठ्ठल रुखूमाईची पूजा करण्यात आली. यावेळी आमदार अनिल पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार स्मिता वाघ यांच्यासह पी.आय.जयपाल हिरे, डॉ.अनिल शिंदे व अनेक मान्यवर व भाविक उपस्थित होते. त्यानंतर शाळकरी मुलांनी भजनं म्हणून नदी पात्र भक्तीमय करून टाकले. आता यात्रोत्सवास पारंपरिक पद्धतीने प्रारंभ झाला आहे.
३ ते ११ मे दरम्यान संत तुकाराम महाराज गाथा भजन होईल. ११ मे रोजी सकाळी ७.३० वाजता मोहन महाराज बेलापूरकर यांचे व दिंडीचे शहरात आगमन होईल. या दिंडीचे स्वागत करण्यासाठी संत सखाराम महाराज संस्थानाचे गादीपती ह.भ.प प्रसाद महाराज हे शहराच्या वेशीवर जातील मोहीनी एकादशीला अर्थात १२ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता रथाची मिरवणूक निघेल. १५ रोजी सखाराम महाराज पुण्यतिथी, १६ रोजी सकाळी सहा वाजता पालखी मिरवणूक निघेल. तर १७ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत मोहन महाराज बेलापूरकर यांचे काल्याचे कीर्तन होऊन या यात्रोत्सवाची सांगता होणार आहे. कोरानानंतर दोन वर्षानी यात्रा भरणार असल्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. प्रशासन आपल्या परीने पुर्णतयारीत आहे. पोलीस बदोबस्त सज्ज आहे. यात्रेत कुठलाही गैर प्रकार व कुठलीही अनुचित घटना घडू नये याची काळजी घेणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या