कार्यक्रम यशस्वीतेसाठी भगवान परशुराम सेवा समिती अध्यक्ष प्रसाद जोशी,सोमनाथ ब्रह्मे, मंगेश काळकर, प्रशांत जोशी प्रफुल्ल जोशी, सारंग पाठक, कमलेश जोशी, अमोल शुक्ल,सारंग गर्गे, व्यंकटेश कळवे, मयुर राव, महेश कुळकर्णी, शुभम वैष्णव, प्रशांत राव, विनोद जोशी नाना जोशी, नाना भावे, किशोर भंडारी,नितीन भावे, ज्ञानेश्वर कुलकर्णी,हरिष देशपांडे, मनोज कुळकर्णी, भटु पाठक इत्यादीनी अथक परिश्रम घेतले.
भगवान परशुराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न!
०४ मे
0
अमळनेर: दि ३ रोजी सायंकाळी वाडीत ह. भ. प. प. पू प्रसाद महाराज यांच्या हस्ते प्रतिमा पुजन व डॉ संदीप जोशी तथा डॉ सौ मयुरी जोशी यांच्या हस्ते महाआरती ने मिरवणुकीची सुरूवात होवून राजहंस चौक कुंटे रोड येथे ज्ञानेश्वर पाठशाळा अध्यक्ष सुनील जोशी यांच्या तर्फे शीतपेय देण्यात आले पुढे तिरंगा चौक बस स्टॅन्ड वरुन महाराणा चौकतुन शिवाजी नाट्यगृहा जवळील परशुराम चौकात प्रतिमेचे पुजन नगरसेवक प्रविण पाठक व सौ स्वातीताई पाठक यांच्या हस्ते पुजन व महाआरती करण्यात आली या प्रसंगी प्रा डॉ प्र ज जोशी, पुरोहीत सेवा संघ अध्यक्ष श्री राजेंद्र निजामपूरकर यांनी मनोगत व्यक्त केले तर सुत्रसंचालन आभार प्रदर्शन हरीभाऊ जोशी यांनी केले. तदनंतर कार्याध्यक्ष डॉ शशांक जोशी, तुषार झेंडे, यांचे पुढाकाराने ब्राह्मण सेवा संघा तर्फे स्नेह भोजन देण्यात आले.या उत्सवात सर्व सामाजिक संस्थानी सहभाग नोंदवला भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती. विविध क्षेत्रातील दिग्गज समाज बांधव कार्यक्रमात सक्रीय सहभागी झाले होते.
Tags
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या