Type Here to Get Search Results !

Banner

लोकमान्य विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत निबंध स्पर्धा संपन्न! (Swatantryacha amrut mahotsav)

 


स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालय येथे आज दिनांक 12 ऑगस्ट रोजी निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत इयत्ता 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या निबंध स्पर्धेचे आयोजन विद्यालयातील मराठी विषयाचे जेष्ठ शिक्षक श्री.जे.के.चौधरी सर यांनी केले. त्यांना श्री.विजय सुर्यवंशी सर यांचे सहकार्य लाभले. या स्पर्धेसाठी लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री रविंद्र लष्करे यांचे मार्गदर्शन लाभले.

निबंध स्पर्धेसाठी इयत्ता 5 वी ते 7 वी या लहान गटासाठी माझा आवडता क्रांतिवीर, स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतीवीरांगणा आणि माझ्या स्वप्नातील भारत हे विषय तर इयत्ता 8 वी ते 10 वी या मोठ्या गटासाठी स्वातंत्र्य लढ्यातील अमळनेर तालुक्याचे योगदान, अमृत महोत्सवी भारत, स्वतंत्र भारत व त्या प्रती माझी कर्तव्ये हे विषय देण्यात आले होते. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या