Type Here to Get Search Results !

Banner

शेठ ला.ना.सा.विद्यालयामध्ये पुस्तक हंडी जल्लोषात साजरी


जळगाव: शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला. ना. सा. विद्यालयामध्ये आज श्रीकृष्णाअष्टमी (गोपाळकाला)निमित्त पुस्तक हंडीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळेस पारंपारिक पद्धतीने दहीहंडी फोडण्या बरोबरच विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होऊन त्यांच्या ज्ञानात वाढ व्हावी या हेतूने प्रमुख आकर्षण म्हणून विविध शैक्षणिक ,सामाजिक , वैज्ञानिक ,साहित्यिक विषयावर आधारित वाचनीय पुस्तके,रंगीबेरंगी पताका , केळीचे खांब,फुगे,नारळ,सुद्धा दहीहंडी सोबत लावण्यात आली होती.
      या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे सर,उपमुख्याध्यापक श्री. प्रशांत जगताप सर, जेष्ठ पर्यवेक्षक श्री संजय वानखेडेसर ,पर्यवेक्षिका सौ. रमा तारे मॅडम यांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन करण्यात आले.या वेळेस ढोल ताशाच्या निनादात, अतिशय जल्लोषात ,उत्साहपुर्वक वातावरणात शाळेतील सकाळ, दुपार विभागातील विदयार्थ्यांनी पुस्तकहंडी फोडून आनंद साजरा केला. 

या कार्यक्रमाचे आयोजन प्रमुख श्री. जगदीश साळुंखे, श्री सुभाष पाटील, सौ. रोहीणी प्रचंड, सौ. रेवती किन्हीकर,सौ.योगिता गवलकर , सौ.रेखा पाटील, सौ.रुपाली महाजन,श्री योगेश सोंजे, श्री पंकज खंडाळे, श्री श्रीकांत घुगे, श्री उल्हास ठाकरे,श्री.हिम्मत काळे,श्री.उमेश ढाकणे , श्री.सुनील अंबिकर,सेविका श्रीमती उषा बावीस्कर, सौ सुरैय्या तडवी ,श्री.किशोर माळी,श्री.जावेद पटेल,तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी केला. या वेळेस ढोल ताशाच्या निनादात शालेय विद्यार्थ्यांनि सामूहिक नृत्य करून जल्लोषात आनंद साजरा केला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या