Type Here to Get Search Results !

Banner

रोटरी क्लब अमळनेर तर्फे मूक जनावरांना लंपी स्कीन प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण!


अमळनेर: रोटरी क्लब अमळनेर तर्फे मूक जनावरांना लंपी स्कीन प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण शिबिर राबवण्यात आले. हे शिबिर रोटरी क्लब तर्फे 14 सप्टेंबर पासून 19 सप्टेंबर पर्यंत राबविण्यात आले. या  शिबिरात एकूण 20 गावातील एकूण 5000  मुकं जनावरांना (गाय, बैल, वासरू) लसीकरण करण्यात आले. या मोहिमेत विशेष सहकार्य म्हणून डॉ. प्रतिभा कोरे (पशुवैद्यकीय अधिकारी) तसेच डॉ.बी.एस पाटील डॉ.मुकेश पाटील डॉ.थोरात, डॉ.नाझीम व इतर सहकारी डॉक्टरांचे सहकार्य लाभले लसीकरण मोहिमेत रोटरी प्रेसिडेंट कीर्तीकुमार कोठारी, सेक्रेटरी तहा बुकवाला, प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर शिबी वसिष्ठ ऋषभ पारख, रोटरी सभासद अभिजीत भांडारकर, देवांग शहा, रोहित सिंघवी, देवेंद्र कोठारी,  डॉ.शरद बाविस्कर, डॉ.किरण बडगुजर, डॉ. राहुल मुठे, अजय केले  सर्व रोटरी सभासद व जैन सोशल ग्रुप अमळनेर  हे उपस्थित होते.

सर्वांच्या सहकार्याने लसीकरण मोहीम प्रामुख्याने  पुढील ग्रामीण भागातील गावात जसे खुर्द, वासरे, खेडी चौभारी निम, भोरटेक, धानोरे,  दहिवद (खुर्द ), भिलाली, ब्राह्मणे, गलवाडे, सबगव्हाण,  वरखेडा, एकलहरी, कोठावल,  एकसहरे व इतर गावात ही करण्यात आली, या गावातील सर्व ग्राम पंचायत सदस्य, गावकरी यांनी मोलाचे सहकार्य केले. रोटरी क्लबचे पी.आर.ओ आशिष चौधरी यांनी अशी माहिती दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या