प्रतिनिधी / जळगाव: येथील खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित जळगाव या संस्थेची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. १८ रोजी सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन येथे मिठता उत्साहात संपन्न झाली. सभेत सर्वप्रथम सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. सभेचे अध्यक्षस्थानी कैलास रामदास पाटील हे होते. सभेस प्रमुख अतिथी म्हणून विष्णू भंगाळे हे होते त्यांच्या प्रमुख उपस्थितीत उपस्थित असलेल्या शिक्षकांमधून सेवानिवृत्त सभासद, जेयष्ठ सभासद, आदर्श शिक्षक, तसेच पतसंस्थेत ज्या सभासदांची वर्गणी जास्त असेल अशा सभासदांचा सत्कार विष्णू भंगाळे व अध्यक्ष कैलास पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी अध्यक्ष कैलास पाटील यांनी प्रास्ताविकात पतसंस्थेचे कामकाज आणि शिक्षकांच्या समस्या व कर्ज वितरण आणि पतसंस्थेचे वार्षिक उत्पन्न याविषयी सविस्तर माहिती देऊन पतसंस्था कशी टिकविण्यात येईल याकडे सर्व सभासद यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे नमूद केले. व्यासपीठावर सर्व सन्मानिय संचालक मंडळ उपस्थित होते. प्रभारी चिटणीस सचिन पाटील यांनी सभेचे इतिवृत्त वाचन केले. सभेस शिक्षकांची बहुसंख्येने उपस्थिती लाभली होती. सभेस येणाऱ्या शिक्षक सभासदास १००० रुपये मिटिंग भत्ता देण्यात आला. सभेची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या