Type Here to Get Search Results !

Banner

ढेकू खू. येथील जिल्हा परिषद शाळेने तयार केला किल्ला!

 

अमळनेर प्रतिनीधी: ढेकू खू. येथील जिल्हा परीषद शाळेचे मुख्याध्यापक डाॅ. कुणाल पवार सर नेहमी वेगवेगळे उपक्रम शाळेत राबवत असतात. दिवाळी निम्नित त्यांनी तयार केला किल्ला. यात इतर सहकारी शिक्षक व विद्यार्थानी यांचे सहकार्य लाभले. यामुळे शाळेतील विद्यार्थाचा बौद्धिक व शारिरीक विकासाला चालना मिळेल. यामुळे विद्यार्थाच्या जिवनात याचा चांगला फायदा होईल.

          या शाळेने तयार केलाल किल्ला पाहण्यासाठी केंद्रप्रमुख दादासो दिलीप सोनवणें यांनी शाळेले भेट दिली. मुख्याध्यापक डाॅ. कुणाल पवार सर सहकारी शिक्षक श्री. विशाल पाटील, श्रीम. सरोजिनी निकम व विद्यार्थी या सर्वाचे कौतुक केले व गावातील नागरिकानी पण किल्ला पाहण्यासाठी गर्दी केली. सर्व स्तरातुन या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. 

       याठिकाणी केंद्रप्रमुख म्हणाले की, असे उपक्रम राबवले पाहिजेत. यामुळे विद्यार्थ्यांत ऐतिहासिक गड किल्ले व आपल्या सुवर्ण इतिहासाबद्दल माहिती होते तसेच भविष्यात समाजात चांगला आदर्श निर्माण होऊ शकतो. विद्यार्थाच्या भावी जिवनात याचा नक्की सकारात्मक फायदा होतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या