Type Here to Get Search Results !

Banner

*गुणवंतांनी उज्वल यश संपादन करीत असताना सुसंस्कृत असा नागरिक होणे ही काळाची गरज आहे ....... एसीबीचे उपविभागीय अधिकारी शशिकांत पाटील*

अमळनेर : - गुणवंतांनी उज्वल यश संपादन करीत असताना सुसंस्कृत असा नागरिक होणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन एसीबीचे उपविभागीय अधिकारी शशिकांत पाटील यांनी श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थानतर्फे विविध क्षेत्रातील यशस्वी मान्यवरांसह तालुक्यातील दहावी बारावी तील ९०% च्या वर असलेले,नीट,सेट,नेट स्पर्धा आदि परिक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात केले. श्री.वर्णेश्वर महादेव मंदिर येथील विविध क्षेत्रातील यशस्वी व विद्यार्थी गुणगौरव समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून अंमळनेर तालुक्याचे सुपुत्र श्री शशिकांत पाटील यांनी पुढे सांगितले कि, 'प्रताप हायस्कूल  ते प्रताप कॉलेज शिक्षणानंतर  मी नगरपरिषदेत मुकादम म्हणून नोकरी केली व जिद्दीने ने एमपीएससीत यशस्वी होत अधिकारी झालो !'असे सांगितले.यावेळी निवृत्त प्राचार्य एस आर चौधरी, हाजी नसरुद्दीन शेख ,अनिल ठाकूर, विजयसिंह पवार,ऍड.तिलोत्तमा पाटील, सौ. मेघाताई हेमंत भांडारकर, सौ. आशालता बाई शंकर चौधरी आदिंसह मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमंत हेमंत शेठ भांडारकर हे होते. चि.जय पवन पाटील अंतुर्ली याने सुभाष बाबू चे भाषण केले.    याप्रसंगी झालेल्या विशेष सत्कारात कु.सिद्धी हिम्मत (एमबीबीएस) , प्रसन्न चौधरी (इस्रो व्हिजिट),१९ वर्षाखालील भारतीय टेनिस बॉल स्पर्धेत निवड झालेला मारवडचा उमेश सुरेश पाटील, देवगाव देवळी येथील संरक्षण मंत्रालयात लिपिक झालेले शरद खैरनार, योगेश छगन घोडके,वाल्मीक पाटील, सौ. जयश्री संदीप पवार हे तिन्ही व्यक्तींचा  कोन बनेगा करोडपती यात यशस्वी ठरल्यामुळे सत्कार करण्यात आला.ज्ञानेश प्रीतम चौधरी बहादरपूर यांचा जर्मनीत बर्लिन येथे एम एस ला नंबर लागल्याबद्दल, सुनील चौधरी धरणगावकर यांचे जळगाव जिल्ह्याला अभिमान असावा असे कार्य आहे म्हणुन त्यांचा विशेष सत्कार करण्यात   आला.  यावर्षी संस्थेने खऱ्या अर्थाने आई-वडिलांची सेवा करणाऱ्यांचा श्रावण बाळ सन्मान पुरस्कार देऊन रविंद्र घनश्याम पाटील, सौ. पुनम रविंद्र पाटील, आत्माराम चौधरी व त्यांचे धर्मपत्नी, योगेश लक्ष्मण महाजन, सौ. दिपाली योगेश महाजन, सुनील भीमराव पाटील, प्रवीण मुकुंदा संदानशिव यांचा  श्रावणबाळ सन्मान पुरस्कार देत गौरव करण्यात आला. तर निखिल अनिल ठाकूर व प्रतिज्ञा ईश्वर चौधरी मारवड हे आरटीओ झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार करण्यात आला. श्री वर्णेश्वर संस्थान चे अध्यक्ष सुभाष चौधरी यांनी प्रास्ताविक केले.सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते व पक्षीमित्र सुनिल भोई यांनी केले. 

             रणजित शिंदे यांनी केले आभार  मानले. यावेळी विजयसिंह पवार यांनी स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात मार्गदर्शन केले तर,खान्देश शिक्षण मंडळाचे  डॉक्टर अनिल शिंदे, अर्बन बँक संचालिका वसुंधरा लांडगे, मराठी कोन बनेगा करोडपती च्या स्पर्धक जयश्री संदीप पवार यांनी मार्गदर्शन केले. डॉ.नितीन पाटील, डॉ.बी. एस.पाटील, डॉ.महेश पाटील, डॉ.प्रशांत शिंदे, डॉ.अनिल शिंदे, डॉ. एस.आर. चौधरी यांनी विद्यार्थ्यांसाठी फाईल ऊपलब्ध करून दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेमंतजी भांडारकर,संजय शुक्ल, आत्माराम चौधरी, भरतसिंग परदेशी, दिलीप हातागळे, राजू देसले, आर बी पाटील,सुशील भोईटे, संतोष पाटील,महेश पाटील आदिंनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या