Type Here to Get Search Results !

Banner

शिवभुमी विद्यालय प्राथमिक विभाग निगडी पुणे येथे प्रवेशोत्सव सोहळा धुमधडाक्यात साजरा

पुणे: दि १५ जून रोजी निगडीतील शिवभूमी विद्यालयात विद्याथा प्रवेशोत्सव सोहळा दरवर्षी प्रमाणे धुमधडाक्यात साजरा करण्यात आला . १ ली ते ४थी च्या बालचिमुकल्यांच्या जातात फुगे कार्टून, फुले देवून विद्यार्थ्यांनी नवीन शैक्षणिक वर्षात मोठ्या जल्लोषात आनंदात पदार्पण केले . मा मुख्याध्यापिका सौ पाटील अश्विनी यांनी विद्यार्थ्यांना तिलक लावून त्यांचे स्वागत केले . फुग्यांनी व फुलांनी सजवलेली शाळा वाजणारा ढोल पथक सर्व शिक्षक वृंद पाहून विद्यार्थ्यांच्या तसेच पालकांच्या चेहऱ्यावर हास्य आनंद जाणवत होते . फुले उधळून विद्यार्थ्यांचे स्वागत झाल्यावर गाणी गोष्टी घेऊन परिपाठ पार पडला नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यां चा परिचय व स्वागत केले गेले तसेच बालवर्गातून पहिलीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष भेट फुले देऊन त्यांचेही स्वागत इतर विद्यार्थ्यामार्फत केले .शाळेतील उपक्रमशील तंत्रशिक्षिका लेखिका कवयित्री श्रीम कोठेकर योगिता यांनी तयार केलेले सेल्फी पॉईंट विद्यार्थ्यांचे आकर्षण ठरले सर्व विद्यार्थी पालक तेथे फोटो काढण्यास उत्सुक होते .उपक्रमाने विद्यार्थ्यांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चांगले संस्कार होतात म्हणून शाळेतील सहशिक्षिका कोठेकर योगिता संजय या सतत झटत असतात.त्याप्रमाणे  प्रत्येक वर्गाचे  शिक्षकही मेहनत करून  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात . शाळेतील अशा विविध उपक्रमांमुळे संस्कारशील मन घडविणारी शाळा म्हणून प्रत्येक जण या शाळेकडे पहातो म्हणून प्रवेश बंद अशी घोषणा दरवर्षी शाळेला लावावी लागते यावर्षी ही या शाळेचा १ ली ते ४थी चा पट जवळजवळ पाचशेच्या वर गेला आहे दरवर्षी १०० % निकाल आणि विविध स्पर्धांमध्ये सहभाग व यश मिळवणारे विद्यार्थी पाहून पालकांचा ओढा या शाळेकडे दिसून येतो त्यामुळे सर्वच स्तरातून या शाळेचे व शाळेतील शिक्षकांचे विद्यार्थ्यांचे कौतूक होत असते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या