Type Here to Get Search Results !

Banner

नवीन मराठी शाळेत शिक्षक पालक सभा संपन्न

अमळनेर- दि. 13 जुलै रोजी येथील नवीन मराठी शाळेत पालक सभा संपन्न झाली. यावेळी सरस्वती पूजनाने सभेला सुरुवात करून मागील सभेचे इतिवृत्त वाचन करण्यात आले. उपस्थित पालकांमधून पालक सभेची कार्यकारिणी तयार करण्यात येऊन निवड झालेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षक व पालक यांच्यात विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.

यावेळी ऑलिम्पियाड स्पर्धेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थी व पालकांचा सत्कार करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक श्री मच्छिंद्र मोरे सर हे अध्यक्ष स्थानी होते. पालक सभेचे उपाध्यक्ष म्हणून हरिप्रसाद कापडे यांची निवड करण्यात आली तर सहसचिव म्हणून संदेश भामरे यांची तर शिक्षण तज्ञ म्हणून ऍड. अमजद खान यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन उज्वल मार्कंडेय यांनी केले तर अतुल भोई यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या