Type Here to Get Search Results !

Banner

वडाळी दिगर शाळेत विद्यार्थ्यांना बूट व पायमोजे वाटप

उपशिक्षणाधिकारी विजय सरोदे यांची विशेष उपस्थिती

जामनेर: विद्यार्थ्यांना बूट मोजे वाटप बाबत शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय १६-०१-२०२४  मध्ये नमूद स्पेसिफिकेशन नुसार, आज जि.प.प्रा.शाळा वडाळी दिगर ता. जामनेर येथे विद्यार्थ्यांना 1जोडी बूट व 2 जोडी पायमोजे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद जळगाव च्या प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी विजय सरोदे यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या समवेत वाकोद केंद्राचे केंद्रप्रमुख विजय गायकवाड हे देखील उपस्थित होते. तसेच कार्यक्रम प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान सांगळे,उपाध्यक्षा पुष्पा गोसावी, गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक मधुकर आवटे, माजी सदस्य राहुल शिनगारे, प्रकाश गोसावी, सावित्रीताई ठाकरे इतर सन्मा.समिती सदस्य व पदाधिकारी, मान्यवर, विद्यार्थी उपस्थित होते.शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक संदिप पाटील यांनी प्रास्ताविक केले, तसेच शासनाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध योजनांबाबत यावेळी माहिती दिली. 

शिक्षणसेवक सुमेधा घुगे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या