Type Here to Get Search Results !

Banner

जि.प.उर्दु बॉईज शाळेच्या शिक्षण परिषदेत उत्कृष्ट शालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन



पारोळा: दि.२८ आज पारोळा केंद्र समुह शाळांची ४ थी शिक्षण परिषद उच्च प्राथमिक उर्दु बॉईज शाळा पारोळा येथे गुणवत्तापुर्ण व उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाली. या परिषदेच्या अध्यक्षपदी केंद्र प्रमुख प्रदिप राजपूत तर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून विश्वासराव पाटील , सार्वे केंद्र प्रमुख संजय पाटील , मिनाक्षी नेरपगार , विशेष शिक्षिका व जागृती भामरे , युवा प्रशिक्षणार्थी हे उपस्थित होते .
परिषदेच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक अजहर हुसैन अब्दुस्समद यांनी प्रस्तावना सादर केली . शाळेच्या विदयार्थ्यांनी विविध गुणदर्शन उपक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. बॉ शाळा क्र ३ चे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांनी आपल्या सानेगुरुजी धडपडणारा आदर्श विद्यार्थी उपक्रमांर्तगत २० विदयार्थ्यांना रायटिंग पॅड व विज्ञान प्रदर्शनात पर्यावरण , दळवळण, उर्जा निर्मिती व बचत, जल सिंचन अशी विविध उपकरणे आपल्या कल्पना शक्तीने साकारणाऱ्या विदयार्थ्यांना रोख बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते दिली. यावेळी सुनिल बडगुजर, विचखेडे यांनी २५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट दिले.
परख राष्ट्रीय सर्वेक्षण या विषयावर चतुर पाटील विचखेडे, मानाक्षी नेरपगार व मोहम्मद मुस्तफा एजाज अहमद यांनी मार्गदर्शन केले. संकलित मुल्यमापन बाबत हसन खान नबी खान व आरिफ अहमद मुश्ताक अहमद यांनी आपले विचार मांडले. राज्यस्तरीय नवोक्रम बाबत शेवगे शाळेचे ओंकार चव्हाण व कलीम अहमद पीरमोहम्मद मोमिनी यांनी उत्तम माहिती दिली. यावेळी गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांनी शिक्षण परिषदेत शाळेने विद्यार्थी निर्मित विज्ञान प्रदर्शनाचे छान आयोजन केले व त्यांना सुलताना मोहम्मद सिद्धीकी , पदविधर शिक्षिका यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले याबद्दल कौतुक व अभिनंदन केले . तसेच अपार आयडी तयार करण्याबाबत येणाऱ्या अडचणी व त्या कशा सोडवाव्यात याबाबत सखोल मार्गदर्शन केले. केंद्र प्रमुख प्रदिप राजपूत यांनी आदिवासी सुवर्ण जयंती , उपस्थिती भत्ता वाटप , विद्यार्थी उपस्थिती वाढविणे व विविध शालेय समिती स्थापना व उपयोग बाबत आढावा घेवुन चर्चा केली. सुंदर असे सुत्रसंचलन मुख्याध्यापक अजहर हुसैन अब्दुस्समद यांनी तर अन्सारी जरीना मोहम्मद जहुर यांनी आभार मानले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या