अमळनेर : येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित ख्यातनाम मंगळ ग्रह मंदिरात भाविकांसाठी नेहमी नाविण्यपूर्ण धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात. महाराष्ट्रातील भाविकांपर्यंत या उपक्रमांबद्दल माहिती पोहचावी या उद्देशाने एसटी महामंडळाच्या सहकार्याने संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचार व प्रसाराचे कार्य हाती घेण्यात आले आहे.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्रभर मंदिराच्या कार्याची व वैशिष्ट्यांबाबत जनजागृती व्हावी . तसेच आपल्या पारंपारिक संस्कृतीची जपणूक व्हावी यासाठी मंगळग्रह सेवा संस्थेचा प्रोऍक्टिव्ह इन आणि आऊट ॲडव्हर्टायझिंग प्रा. लिमिटेड या कंपनीबरोबर नुकताच करार झाला आहे. या कराराद्वारे महाराष्ट्रातील सर्व प्रमुख जिल्ह्यांमध्ये एसटी महामंडळाच्या जलद बसेसवर मंदिराची व मंदिरातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती प्रसारित करण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये एकूण १८ जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. या उपक्रमासाठी संस्थेचे ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील यांचे सहर्काय लाभले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या