अमळनेर : येथील वकील संघाच्या अध्यक्ष पदी ऍड किरण अजबराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
अमळनेर वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी ऍड किरण पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता.मुदतीत त्यांच्या विरुद्ध एकही अर्ज दाखल झाला नाही यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिनांक 1 जानेवारी रोजी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ऍड आर.डी.चौधरी व ऍड के. व्ही. कुळकर्णी यांनी काम पाहिले.
ऍड. किरण पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून अमळनेर न्यायालयात कार्यरत असून विविध सामाजिक व धार्मिक कार्यात देखील ते सक्रिय असतात.अत्यंत सुस्वभावी व्यक्तिमत्व असल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.सदर निवडीबद्दल समस्त वकील बांधवांनी त्यांचे अभिनंदन व सत्कार केला.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या