अमळनेर : शहरातील नामांकित शिक्षण संस्था,खानदेश शिक्षण मंडळाची जनरल मिटिंग घेण्यात यावी व मयतांच्या वारसांना सभासद बनवा अशा मागणीचे निवेदन प्रसाद शर्मा यांनी संस्थेच्या कार्याध्यक्षाना दिले आहे.
यावेळी डॉ संदेश गुजराथी, नीरज अग्रवाल, योगेश मुंदडा,प्रदीप अग्रवाल,अध्यक्ष उपाध्यक्ष देशमुख,आणि प्राचार्य डॉ ए बी जैन यावेळी उपस्थित होते, गेल्या तीन वर्षात संस्थेची कोणतेही जनरल मिटिंग झालेली नाही. तसेच ऑडीट झाल्या नंतर जनरल मिटिंग घ्यायची होती, परंतु संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
यासह दिवंगत फेलो ,पेट्रन, व्हाईस पेट्रन यांच्या वारसाला १ जानेवारी २०१९ पासुन फेलो करणार होते,तसा ठराव देखील झालेला आहे. धर्मदाय आयुक्त जळगाव यांनी यांनी देखील याबाबत निकाल दिला आहे. तरी सुद्धा संचालक मंडळाने आज पर्यंत दिवंगत सभासदाच्या वारसाला ला सभासदत्व दिलेले नाही तरी संस्थेची सर्वसाधारण सभा तात्काळ घ्यावी,व सभासदत्व द्यावे अशी मागणी शर्मा यांनी निवेदनातून केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या